मुंबई : मुंबईतील ऑक्टोबर महिन्यात शहरातील हेवेची गुणवत्तासुद्धा ढासळत चालली आहे. मागील १२ दिवसातील अहवालानुसार शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे.
वातावरणातील घातक असलेले पीएम २.५ आणि पीएम १० धुलीकणांचे प्रमाण वाढले असून सध्या हवा गुणवत्ता (एअर क्लॉलिटी इंडेक्स) निर्देशांनुसार मुंबई शहरात हवेची गुणवत्ता १९९ क्युबीक मीटर असून त्यात धुलीकणांच्या प्रमाणाने अतीधोकादायक पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सध्या शहरातील हवा धोकादायक असून त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहेत.. वाढत्या प्रदुषणाने मुंबईतील हवा खराब होत चालली आहे. एअर क्लॉलिटी इंडेक्स नुसार हेवेतील धुलीकण हवेत असलेल्या पीएम १० आणि पीएम २.५ या धुलीकरणाचे प्रमाण नियमित वाढत आहे. शनिवारच्या नोंदीनुसार शहरातधोकादायक धुलीकण पीएम १० चे हेवेतील प्रमाण २४६ क्युबीक मीटर आहे. तर अतीधोकादायक पीएम २.५ चे प्रमाण १०९ क्युबीक मीटर तर कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण ९६७ क्युबीक मीटर आहे. पीएम २.५ हे धुलीकण अधिक धोकादायक असुन गुणवत्ता पातळीनुसार ७.३ टक्के अधीक आहे.
एअर क्वॉलिटी इंडेक्स नुसार ५० एक्यूआय पर्यंतची हवा चांगली आहे. तर १०० ते २०० एक्यूआय पर्यंतची हवा सर्वसाधारण तर २०० ते ३०० एक्यूआय पर्यंतची हवा शरिरास घातक आणि ३०० ते ४०० एक्यूआय पर्यंतची हवा अतिशय घातक तर ४०० एक्यूआय पर्यंतची हवा अतिशच गंभीर मानली जात आहे.
• पीएम २.५ आणि पीएम १० ही हवेतील प्रदूषित धुलीकणाचे प्रकार आहेत. यात पीएम २.५ हे अधिक घातक असून ते श्वसनक्रियेव्दारे शरिरात सहज जातात. याचे हवेतील सामान्य प्रमाण हे ३५ मायक्रो क्युबिक मीटर पेक्षा जास्त नसावे, हे कण पीएम १० च्या तुलनेने अधिक सुक्ष्म असून सहज शरीरात प्रवेश करतात. यामुळे श्वसनाचे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. तर पीएम १० हे कण तुलनेने पीएम २.५ पेक्षा मोठे असतात. याचे सामान्य हवेतील प्रमाण ५४ मायक्रो क्युबिक मीटर पेक्षा जास्त नसावे यामुळे हे कण शरीरात गेल्यास उच्च रक्तदाबाचा परिणाम होतो.