

गेल्या काही दिवसांपासून एनसीबी आणि भाजप विरोधात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोर्चाच उघडला आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांनी आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अखत्यारित येत असलेल्या वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्या संदर्भात (Nawab Malik on Waqf Board) ईडीने आज पुण्यात सात ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना धक्का तर नाही ना? याची चर्चा सुरु झाली आहे.
यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी ईडीच्या कारवाईवरून Nawab Malik on Waqf Board त्यांनी बोलताना सांगितले की, पुण्यातील वक्फ बोर्डाच्या कार्यालयात छापेमारी झालेली नाही. एका ट्रस्टवर छापा पडल्याची माहिती मिळत आहे. काहींना वाटलं की नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली आहे, पण तसं काही झालेलं नाही. जर चौकशी होणार असेल तर आम्हीच स्वागतच करू. ईडी माझ्या घरी आल्यास स्वागत करू, असा खोचक टोमणाही त्यांनी मारला.