Maharashtra Weather Forecast | राज्यातील ‘या’ भागांत २ ते ३ दिवसांत पावसाचा जोर वाढणार | पुढारी

Maharashtra Weather Forecast | राज्यातील 'या' भागांत २ ते ३ दिवसांत पावसाचा जोर वाढणार

पुढारी ऑनलाईन : पुढील २ ते ३ दिवसांत उत्तर महाराष्ट्र, कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात आज ढगाळ हवामान राहणार असून अधूनमधून जोरदार सरीची शक्यता असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. (Maharashtra Weather Forecast) आज कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशच्या मध्य भागावर आहे. पुढील २ दिवसांत तो गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांकडे सरकण्याची शक्यता आहे.

 संबंधित बातम्या 

पुढील दोन आठवड्यांत देशभरात दमदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आहे. दरम्यान,

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच १६ आणि १७ सप्टेंबर दरम्यान विदर्भ तसेच कोकण आणि गोव्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. १८ सप्टेंबरपर्यंत गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छच्या विविध भागात मुसळधार पावसाचाही इशारा हवामान खात्याने दिला आहे. या व्यतिरिक्त १६ सप्टेंबरपर्यंत पूर्व मध्य प्रदेशातील विविध भागात तर पश्चिम मध्य प्रदेशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओडिशा, छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तराखंडच्या काही भागामध्येही मुसळधारेची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा तसेच दक्षिण आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही पावसाच्या हजेरीची चिन्हे आहेत.

Back to top button