Minister Nawab Malik : ‘आता पाहूया, वानखेडेंच्‍या काळ्या कारनाम्‍यांची माहिती कोण उघड करतंय?’ | पुढारी

Minister Nawab Malik : 'आता पाहूया, वानखेडेंच्‍या काळ्या कारनाम्‍यांची माहिती कोण उघड करतंय?'

मुंबई : पुढारी ऑनलाईन

आर्यन खान प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्‍यात यावी, अशी मागणी मी केली होती. आता या प्रकरणाच्‍या तपासासाठी वरिष्‍ठ पोलिस अधिकारी संजय सिंह यांच्‍या नेतृत्‍वाखालील विशेष तपास पथक ( एसआयटी ) नियुक्‍त करण्‍यात आली आहे. आता समीर वानखेडे यांच्‍या काळ्या कारनाम्‍यांची माहिती कोण उघड करतंय ? ते पाहूया, अशा शब्‍दात मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी पुन्‍हा एकदा समीर वानखेडे यांच्‍यावर ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून हल्‍लाबोल केला.

मलिक यांनी ट्‍विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, आर्यन खान याचे अपहरण आणि त्‍याच्‍या सुटकेसाठी कोट्यवधी रुपयांची मागितलेली खंडणी याप्रकरणी समीर दाऊद वानखेडे यांच्‍या भूमिकेच्‍या तपासासाठी एसआयटी चौकशी करण्‍यात यावी, अशी मागणी मी केली होती. आता पाहूया कोणती तपास संस्‍था वानखेडे यांच्‍या काळ्या कारनाम्‍यांचा भांडाफोड करताय ते.

(Minister Nawab Malik) ही तर केवळ सुरुवात आहे : नवाब मलिक

समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणाच्‍या तपासातून हटविण्‍यात आले आहे. तसेच अन्‍य पाच गुन्‍ह्यांच्‍या तपासातूनही त्‍यांची हकालपट्‍टी करण्‍यात आली आहे. वानखेडे यांनी तपास केलेल्‍या एकुण २६ प्रकरणाची पुन्‍हा चौकशी करणे गरजेचे आहे. आता कुठे कारवाईची सुरुवात झाली आहे. भ्रष्‍ट व्‍यवस्‍था बदलण्‍यासाठी अद्‍याप खूप मोठे काम करायचे आहे. आम्‍ही ते करणारच, असेही मलिक यांनी म्‍हटले आहे.

 

हेही वाचलं का?

 

 

 

 

Back to top button