Maharashtra Politics : शिंदे, फडणवीस, पवारांचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, वडेट्टीवार म्हणाले… | पुढारी

Maharashtra Politics : शिंदे, फडणवीस, पवारांचा 'ताे' व्हिडिओ व्हायरल, वडेट्टीवार म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ सध्‍या साेशल मीडियावर तुफान व्‍हायरलं हाेत आहे. हा व्‍हायरल हाेणारा व्हिडिओ विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या X खात्यावर शेअर करत लिहलं आहे की, ‘नाकर्ते सरकार’. जाणून घ्या काय आहे प्रकरण. (Maharashtra Politics)

‘आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं’ 

जालना येथे जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्‍नी २९ ऑगस्‍टपासून बेमूदत उपाेषण सुरु केले आहे. मंगळवारी त्‍यांच्‍या उपाेषणाचा पंधरावा दिवस  होता. जरांगे पाटील यांनी सरकारपुढे पाच अटी ठेवत एका महिनाच्या कालावधी दिला. हे प्रकरण चर्चेत असतानाच सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ तेजीने व्हायरलं होत आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Maharashtra Politics : काय आहे त्‍या व्हिडिओमधील संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणासंबंधी  बैठक मंगळवारी (दि.१२) घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला हे तिघे बोलत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होवू लागला आहे. त्या व्हिडिओमध्ये ते म्हणत आहेत की,

एकनाथ शिंदे : “आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.”

अजित पवार  : “हो,येस…”

देवेंद्र फडणवीस : “माईक चालू आहे”

भिडेंच वक्तव्य चर्चेत असतानाच…

मंगळवारी (दि.१२) संभाजी भिडे मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासंदर्भात भेटायला गेलेेले. चर्चेदरम्यान भिडे म्हणाले होते की, “आता राजकारण्यांच्या हातात हा प्रश्न आहे. आता जे राजकारणात सत्तेवर बसले आहेत म्हणजे एकनाथ शिंदे ते कपटी नाहीत, तर देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत, अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले तरी काळजी करणारा माणूस आहे. सरकारमधील हे तिन्ही नेते आपल्या शब्दाशी प्रामाणिक राहतील. ते राजकारणी आहेत म्हणून भीती बाळगू नका. ते शब्द देतील तो त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचं काम माझ्याकडे असेल. हे उपोषण मागे घ्यावे. जो पर्यंत मराठा आंदोलनाचा जो उद्देश आहे तो सफल होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत.” भिडे यांचे वक्तव्य चर्चेत असतानाच शिंदे, फडणवीस आणि पवार यांचा व्हिडिओ व्हायरल होवू लागला आहे. त्यांना सोशल मीडियासह राजकीय वर्तूळात टीका केली जावू लागली आहे.

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण….

व्हिडिओनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या X खात्यावर स्पष्टीकरण देत म्हंटल आहे की, “माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.” म्हंटल आहे.(सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा ‘व्हायरल व्हिडिओ’ )

 

हेही वाचा 

Back to top button