मुंबई-गोवा महामार्गावर खड्डयांमूळे एसटी प्रवासादरम्‍यान महिलेची आठव्या महिन्यातच प्रसूती | पुढारी

मुंबई-गोवा महामार्गावर खड्डयांमूळे एसटी प्रवासादरम्‍यान महिलेची आठव्या महिन्यातच प्रसूती

रायगड, पुढारी वृत्‍तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल ते महाड दरम्यान एसटीने प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेची प्रसूती झाल्‍याची माहिती एस.टी. चालक-वाहकाने दिली. प्रसुती झालेली महिला आणि बाळ हे सुखरूप असून बाळाचे वजन १.८ असल्यामुळे त्यास कोलाड आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. पुढील उपचारासाठी अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालय दोघांनाही हलविण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, पेण वडखळ येथून कोलाड इंदापूरकडे प्रवास करणारी गरोदर महिला व तिचे पती हे दोघे पनवेल ते महाड एस.टीने (क्र.एम.एच.१४, बी.टी.२६३२) प्रवास करत होते. ही बस कोलाड नजीकच्या पुई महिसदरा पुलावरील मोठ्या खड्डयांमुळे आदळ आपट करत कोलाडकडे जात होती. बसच्या आदळ-आपटमध्ये अचानक महिलेच्या पोटात दुखू लागले आणि तिला बसमध्येच कळा सुरु झाले. दरम्‍यान, महिलेची प्रसूती ही बस मध्ये झाली.

एसटी चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधानाने एसटी बस ही आंबेवाडी येथील शासकीय प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आणली. सदरच्या महिलेची प्रसूती व त्याच्या बाळाचे उपचार हे येथील आरोग्य केंद्रात करण्यात आले. चालक व वाहकांच्या प्रसंगावधाने आई व बाळ सुखरूप आहे.

परंतु महिलेची प्रसूती ही आठ महिन्याने झाल्याने बाळाचे वजन कमी असल्याचे निदर्शनास आले. सदरची महीला व तिच्या बाळावर पुढील उपचार करण्यासाठी रायगड जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे पाठवण्यात आल्‍याची माहिती वैद्यकीय डॉक्टर तिवडे यांनी दिली.
एसटीचे चालक गोविंद जाधव व वाहक नामदेव पवार यांनी प्रसांगवधान दाखवत वेळेवर महिलेला रुग्णालयात नेले. महिलेची मोठया संकटातून सुखरूप सुटका झाली. परंतु या खड्डयांचे काय? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

.हेही वाचा 

जालना : मराठवाड्यात चक्का जामचा इशारा; अंतरवाली सराटी लाठीमार चौकशीसह गुन्हे परत घेण्याची मागणी

माझी सर्व ताकद वैभव पाटलांच्या पाठीशी उभी करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

सूरज पांचोली ७ वर्षांपासून ‘तिच्या’ रिलेशनशिपमध्ये! म्‍हणाला ‘खऱ्या प्रेमाची तुलना करता येत नाही’

Back to top button