जालना : मराठवाड्यात चक्का जामचा इशारा; अंतरवाली सराटी लाठीमार चौकशीसह गुन्हे परत घेण्याची मागणी | पुढारी

जालना : मराठवाड्यात चक्का जामचा इशारा; अंतरवाली सराटी लाठीमार चौकशीसह गुन्हे परत घेण्याची मागणी

जालना, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा तसेच अंतरवाली सराटी येथील अमानुष लाठीमार, अश्रूधूर गोळीबार यांची सखोल‌ न्यायालयीन चौकशी करावी, निष्पाप गावक-यावरील गंभीर गुन्हे बिनाविलंब परत घ्यावेत या मागणी साठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज व मराठा समाजाच्या विविध सामाजिक संघटनाच्या वतीने सोमवार (दि. ११) पासून बेमुदत जालना शहर आणि संपूर्ण जालना जिल्ह्यात शांततेत ठिय्या आंदोलन तसेच मागण्या मान्य न झाल्यास 16 सप्टेंबर पासून मराठवाड्यात चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

याबाबत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि,मनोज जरांगे पाटील विनंती करताहेत तसा शासन आदेश शासनाने तातडीने काढला नाही तसेच विनाविलंब अंतरवाली सराटी ग्रामस्थांवरील दाखल गुन्हे तातडीने परत घेतले नाहीत तर येत्या १६ सप्टेंबर रोजी संपुर्ण मराठवाड्यात उत्स्फूर्त चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र आणि सकळ मराठा समाजाच्या वतीने असे आवाहन राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील, अंकुशराव राऊत, विमलताई आगलावे, शितलताई तनपुरे, विभावरी ताकट, मनिषा भोसले, सुभाष कोळकर, राजेंद गोरे, सदाशिव भुतेकर, रमेश पा. गव्हाड, रामधन कळंबे, कृष्णा पडुळ, प्रभू गाढे, राजूबापू ज-हाड , दत्ता शिंदे, नंदू दाभाडे, पंकज ज-हाड, संभाजी उबाळे, बळीराम शिंदे, ज्ञानेश्वर डुकरे, प्रविण भुतेकर अशोक उबाळे, आर. डी. पवार, माऊली कदम, धीरज रक्ताटे, सर्जेराव बोराडे, निळकंठ वायाळ, किसनराव मोरे, किशोर मरकड, हनुमंत धांडे, प्रल्हाद उगले, दिलीपराव चव्हाण, माऊली तनपुरे, सयाजीराव भगस, महादेव घेंबड, जयप्रकाश चव्हाण, आदींनी केले आहे.

Back to top button