सूरज पांचोली ७ वर्षांपासून ‘तिच्या’ रिलेशनशिपमध्ये! म्‍हणाला ‘खऱ्या प्रेमाची तुलना करता येत नाही’ | पुढारी

सूरज पांचोली ७ वर्षांपासून 'तिच्या' रिलेशनशिपमध्ये! म्‍हणाला 'खऱ्या प्रेमाची तुलना करता येत नाही'

पुढारी वृत्‍तसेवा : जिया खान आत्महत्या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर सूरज पांचोली त्‍याने आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे सुरू केली आहेत. अनेक मुलाखतींमध्ये तो त्‍याच्या आयुष्यातील शोकांतिकेबद्दल आणि अफेअर्सबद्दलही मनमोकळेपणाने बोलतो. सूरज पांचोली म्‍हणाला, अभिनेत्री जिया खान या प्रकरणातून सावरली असून ती गेल्या 7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.

सूरज पांचोलीने माध्यमांशी बोलताना तो म्‍हणाला, त्याच्या नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. तो म्हणाला- जिया खानसोबत माझे नाते सर्वात कमी काळासाठी होते. त्यानंतरही मी रिलेशनशिपमध्ये आहे. मी या नात्यात 7 वर्षांपासून आहे. माझ्या आयुष्यात मी जेवढ्या नात्यात आलो, त्यात जिया खानसोबतची नाती सर्वात लहान होती.

सूरज पुढे म्हणाला की, मी 7 वर्षांपासून खूप सुंदर नात्यात आहे. खऱ्या प्रेमाची आणि काळजीची तुलना करता येत नाही. जेव्हा आपण एखाद्याकडून प्रेम मिळवता आणि त्या बदल्यात ते देता तेव्हा ही एक सुखद भावना असते. माझ्यासाठी हे नाते खूप खास आणि वैयक्तिकही आहे. मी एक वाईट प्रेमी आहे असा माझ्याबद्दल लोकांचा समज असण्याची शक्यता आहे, पण तसे नाही. जे लोक मला जवळून ओळखतात ते मला चांगले ओळखतात. माझ्या प्रतिमेचा गैरसमज झाला आहे.

मात्र, सूरज पांचोलीने आपल्या प्रेयसीबद्दल फारसा खुलासा केला नाही आणि तो वैयक्तिक ठेवणे आवश्यक मानतो. त्याला विचारले असता त्याने स्पष्ट नकार देत ओळख उघड करू शकत नसल्याचे सांगितले. मला माझे नाते गोपनीय ठेवायचे आहे, असे तो म्‍हणाला.

.हेही वाचा 

Manoj Ghorpade : ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर

G-20 Summit: जी-२० परिषदेची सांगता; अध्यक्षपद ब्राझीलकडे सुपूर्द

संसदेत ‘जवान’चे स्क्रिनिंग करण्‍याची हिंमत आहे? : जयराम रमेश

Back to top button