पुढारी ऑनलाईन डेस्क : Vijay Wadettiwar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात अजित पवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन यानंतर ते कोल्हापूरात सभा घेणार आहेत. यावर 'जर मराठा आंदोलनादरम्यान मराठा समाजाचे नेतेच 'रोड शो' करत असतील, तर कोणाला पाठिंबा द्यायचा हे 'मराठा' समाजच ठरवेल. असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्या पुणे येथील रोड-शो वरून लगावला आहे.
काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी G20 परिषदेवर देखील मत व्यक्त केले आहे. दिल्लीतील G20 परिषदेवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, बाबांनी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) संविधानाचा मसुदा तयार केला आणि बापूंनी (महात्मा गांधी) या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या दोघांशिवाय भारताचा इतिहास समजूच शकत नाही, हे संपूर्ण जगाला माहित आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
Vijay Wadettiwar: देशाचा इतिहास काँग्रेस, गांधी, आंबेडकर आणि नेहरूंचा…
देशाची राजधानी दिल्लीत G20 परिषद होत आहे. या परिषदेचा आज रविवारी (दि.१०) दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशीचे सत्र सुरू होण्यापूर्वी G20 मधील राष्ट्रप्रमुखांनी राजघाट येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीला भेट देत, त्यांना अभिवादन केले. यावर बोलताना विजय वड्डेटीवार म्हणाले, G20 परिषदेसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनी बापूंच्या समाधीला भेट दिली, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. जगाला सांगण्यासाठी भारताच्या इतिहासात भाजपचे एकही नाव नाही, देशाचा इतिहास हा काँग्रेस, गांधी, आंबेडकर आणि नेहरूंचा आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.