सनी देओलला जो न्याय तो नितीन देसाईंना का नाही : संजय राऊत यांचा सवाल | पुढारी

सनी देओलला जो न्याय तो नितीन देसाईंना का नाही : संजय राऊत यांचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : “सनी देओल यांना जो न्याय लावला तो न्याय नितीन देसाईंना का नाही,” असा सवाल ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. बंगल्याचा लिलाव पुकारल्यानंतर लगेच दिल्लीतून सुत्रं हालली मग नितीन देसाई यांच्यासोबत अन्याय का? असा सवालही राऊत यांनी केला आहे.

सनी देओल पंजाबमधून निवडून आले आहेत ते भाजपचे खासदार आहेत. त्यांनी ७० कोटी कर्ज घेतले होते, ते कर्ज फेडू शकले नाहीत. म्हणून बँकेने त्यांच्या बंगल्याचा लिलाव पुकारला होता. त्यासंदर्भात नोटीसा काढल्या, पण २४ तासामध्ये दिल्लीतून काही सुत्र हालली आणि त्यांचा लिलाव थांबवण्यात आला. त्यांना आणि त्याचा बंगला वाचवण्यात आला. हाच न्याय नितीन देसाई यांना का नाही. सनी देओल भाजपचे खासदार आहेत, त्यांचे स्टार प्रचारक आहेत म्हणून त्यांना एक न्याय आणि नितीन देसाईंना वेगळा न्याय का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

‘नितीन देसाईंनी उद्धव ठाकरेंकडे मागितली होती मदत’

नितीन देसाई हे उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेले होते. याची खात्रीशीर माहीत माझ्याकडे आहे. संजय राऊत देसाई यांच्या मृत्यूचे भांडवल करत आहेत. त्यांनी हे खर आहे की नाही याचं उत्तर द्यावं. अनेक मराठी उद्योजक उद्धव ठाकरेंच्या दरवाजात गेले होते. त्यांना मदत केली नाही हाकलून दिले याची यादी जाहीर करणार आहे, असे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button