Chandrayaan-3 Mission : चांद्रयान-३ मोहिमेतील ३ पैकी २ उद्दिष्ट्ये पूर्ण; ISRO ने दिली माहिती | पुढारी

Chandrayaan-3 Mission : चांद्रयान-३ मोहिमेतील ३ पैकी २ उद्दिष्ट्ये पूर्ण; ISRO ने दिली माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने शनिवारी (दि.२६) दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत चांद्रयान मोहिमेतील तीन उद्दीष्टांपैकी दोन उद्दीष्ट्ये साध्य झाली आहेत. तर तिसऱ्या उद्दीष्टावर काम सुरू आहे, अशी माहिती इस्रोने एक्सवरून (ट्विटर) दिली आहे.

इस्रोने एक्सवरून (ट्विटर) दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत चांद्रयान-३ संदर्भातील चंद्राच्या पृष्ठभागावर लँडरचे सॉफ्ट लँडिंग आणि रोव्हर लँडरमधून खाली उतरून सुस्थितीत फिरणे ही मुख्य उद्दीष्ट्ये पूर्ण झाली आहेत. तर तिसरे उद्दीष्ट सर्व पेलोड सामान्यपणे कार्य करत आहेत की नाही याची देखरेख सुरू आहे, असे इस्रोने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

यापूर्वी इस्रोने चांद्रयान-३ मधून प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्याचा व्हिडिओ जारी केला होता. यानंतर काल (दि.२७) प्रज्ञान रोव्हर लँडरमधून उतरल्यानंतर काही अंतरावर ‘शिवशक्ती पॉइंट’ भोवती फिरत असल्याचा व्हिडिओ इस्रोकडून शेअर करण्यात आला होता.

Chandrayaan-3 Mission : आत्तापर्यंत चांद्रयान-३ ने केली ही उद्दिष्टे पूर्ण

🔸चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे प्रात्यक्षिक पूर्ण झाले☑️
🔸चंद्रावर फिरणाऱ्या रोव्हरचे प्रात्यक्षिक पूर्ण झाले☑️

Pragyan Rover: चंद्रावर लँडर उतरलेली जागा आता ‘शिवशक्ती’ पॉईंट- पीएम मोदी

चांद्रयान-३ चे लँडर ज्या ठिकाणी उतरले, ती जागा आता ‘शिवशक्ती’ पॉईंट म्हणून ओळखली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूर येथील इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये बोलताना केली. “२३ ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर ध्वज फडकावला. आतापासून हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून ओळखला जाईल”, (Pragyan Rover) अशी घोषणाही पीएम मोदी यांनी केली होती.

हेही वाचा:

Back to top button