मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावरून परतले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्‍वागत | पुढारी

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावरून परतले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्‍वागत

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जपान दौऱ्यावर जाऊन आले. या दौऱ्यावरून परत आल्यानंतर आज त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

जपानने विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या दौऱ्यात जपानमधील जायका, सोनी, डेलॉइट यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधला. महाराष्‍ट्र राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक यावी, तसेच जपान आणि भारत यांच्यातील परस्पर संबंध अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी प्रयत्न केले. तसेच जपानमधील वित्तसंस्थांसमोर केलेल्या सादरीकणामुळे राज्यातील विकासप्रकल्पांना वित्तीय सहकार्य मिळणे शक्य होणार आहे.

या भेटीदरम्यान जपानमधील कोसायन विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली. त्याबद्दल देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Back to top button