Accident : नाशिक-मुंबई महामार्गांवर अपघात; दोघांचा मृत्यू, २ जखमी - पुढारी

Accident : नाशिक-मुंबई महामार्गांवर अपघात; दोघांचा मृत्यू, २ जखमी

कसारा, पुढारी वृत्तसेवा : नाशिक-मुंबई महामार्गांवरील वेहलोली (वासिंद) जवळ ट्रक आणि दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले. ट्रक (MH 19 CY 4304) भरधाव वेगात मुबईकडे जात होता. नाशिक-मुंबई महामार्गावरील वासिद जवळील वेहलोली गावानजीक ट्रकचा ब्रेक फेल झाला अन्  चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले.

या चालकाने कामानिमित्त दुचाकीने कल्याणकडे जात असलेल्या दुचाकीस्वारास (MH 05 BJ 2427) धडक दिली. यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पप्पू दशरथ भोईर (वय-22, रा. वेळूक कसारा) असे त्याचे नाव होते. तर त्याच्यासोबतचा मित्र गंभीर जखमी झाला.

दुचाकीला धडक देऊन पुढे गेलेला हा ट्रक महामार्गाच्या लगताच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. त्या ट्रकच्या साहित्याखाली दबून ट्रकचालकाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने मदतकार्य सुरू केले.

आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य सुनील करवर यांनी अपघतातील दुचाकीवरील जखमी व्यक्तीला शहापूर उपजिल्हा रुग्णाल्यात दाखल केले. तर महामार्गाच्या 1033 रुग्णवाहिकेतून जखमींना आणि मृत्यू झालेल्यांना रुग्णालयाकडे नेण्यात आले. दरम्यान या प्रकरणी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वासिंद, शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button