मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे | पुढारी

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून संप पुकारलेला होता. सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत काही मागण्या मान्य केल्यामुळे हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली.

त्यामुळे सायंकाळपर्यंत सर्व चालक आपापल्या बसवर कार्यरत होणार असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत वार्षिक रजा या भर पगारी करण्यात याव्यात, कर्मचाऱ्यांनी वार्षिक बोनस, साप्ताहिक रजा, वार्षिक वेतनवाढ वाढ मिळावी तसेच कामगारांना कामावर येण्यासाठी मोफत पास देण्याची सुविधा देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. दरम्यान अन्य मागण्यासाठी बस कॉन्ट्रॅक्टर सोबत आयुक्तांनी बैठक घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button