No Confidence Motion: राहुल गांधीवरील वक्तव्यावरून विरोधक संतप्त | पुढारी

No Confidence Motion: राहुल गांधीवरील वक्तव्यावरून विरोधक संतप्त

पुढारी ऑनलाईन :  लाेकसभेत आजपासून विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आपले म्हणणे मांडताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, त्यांनी गौरव गोगोई यांचे नुकतेच ऐकले, पण राहुल गांधी अशा महत्त्वाच्या विषयावर बोलतील, अशी अपेक्षा होती. हे ऐकताच विरोधी पक्षाचे खासदार संतप्त झाले आणि त्यांनी निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याविरोधात सभागृहात गदारोळ सुरू केला.

दुबे यांच्या वक्तव्यावर विरोधक पुन्हा चिडले

विरोधी पक्षाकडून सर्वप्रथम आसाम काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी प्रस्तावार बाजू मांडली. यानंतर झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सभागृहापुढे आपले मत सभागृहात उभारले असता त्यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख करताच संसद सभागृहात मोठा गदारोळ झाला. निशिकांत दुबे म्हणाले की, राहुल गांधी बोलतील, अशी मला आशा होती, कारण हे प्रकरण मीडियात मांडले जात होते. चला, काही हरकत नाही, राहुलजी उशिरा उठले असतील, त्यांना बोलता येत नसेल, असेही खोचक वक्तव्य त्यांनी केले.
आमचे पंतप्रधान म्हणतात, हा विरोधकांचा अविश्वास नाही तर त्यांच्यामधील हा विश्वास ठराव आहे.

मणिपूरच्या इतिहासाचा मी बळी-निशिकांत दुबे

आमचे पंतप्रधान म्हणतात, हा विरोधकांचा अविश्वास नाही तर त्यांच्यामधील हा विश्वास ठराव आहे. गौरव गोगोई बोलताना म्हणाले की, तुम्हाला मणिपूरबद्दल माहिती नसेल. तुमच्यापैकी बरेच जण मणिपूरला गेलेही नसतील. पण मी मणिपूरच्या इतिहासाचा बळी आहे. मणिपूरमध्ये माझ्या मामाचा पाय गमावला. ते सीआरपीएफचे डीआयजी होते. एन के तिवारी मणिपूरला आयजी म्हणून गेले तेव्हा तुमच्या (काँग्रेस) सरकारने त्यांना अटक केली, असेही निशिकांत दुबे यांनी सभागृहापुढे आपले मत मांडताना स्पष्ट केले.

सोनिया गांधींवरही दुबेंनी साधला निशाणा

सोनियाजी इथे बसल्या आहेत. मी त्याचा आदर करतो. सोनिया गांधींवर हल्लाबोल करताना दुबे म्हणाले, सोनियाजींना दोन गोष्टी करायच्या आहेत. मुलला सेटल करणे आणि जावयाला भेट देणे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी पुन्हा निषेध नोंदवला.

हेही वाचा:

Back to top button