नाशिक-मुंबई महामार्गावर उबंरमाळी येथे खड्डा चुकवताना आयशर गाडी महामार्गावर पलटी

आयशर गाडीचा अपघात
आयशर गाडीचा अपघात
Published on
Updated on

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा नाशिक-मुंबई महामार्गावर उबंरमाळी येथे चा-याची कुटीने भरलेली टाटा आयशर गाडी खड्डा चूकवताना भररस्यात उलटली. ही घटना (शुक्रवार) पहाटे तीन वाजता घडल्याची माहिती उबंरमाळी येथे चेक पोस्ट महामार्ग वाहतूक पोलीसांनी दिली. या गाडीचा चालक हा मद्यप्रशान केल्याचे येथील पोलीसांनी सांगितले.

नाशिक कडून मुंबई दिशेला जाताना शहापूर तालुक्यातील उबंरमाळी महामार्गावर पडलेले खड्डे आणि लावण्यात आलेले बॅरिगेट मधून मार्ग काढताना गाडीचे चाक खड्ड्यात फसल्याने काही क्षणात गाडी महामार्गावर पलटी झाली. यामुळे या मार्गाची एकलेन सुरू आहे. मात्र अपघात होऊन सहा तास उलटूनही अद्याप अपघाती वाहन बाजूला करण्यात आले नसल्याने वाहनचालकाना एकाच लेनचा वापर करत मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्‍या आहेत. अपघाती वाहनाचा चालकाने मद्य प्राशन केल्‍याचे उबंरमाळी येथील चेक पोस्ट पोलीसांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news