Nitin Desai death : नितीन देसाई यांच्यावर मानसिक दबाव होता होता?, अजित पवारांनी दिले चौकशीचे आश्वासन | पुढारी

Nitin Desai death : नितीन देसाई यांच्यावर मानसिक दबाव होता होता?, अजित पवारांनी दिले चौकशीचे आश्वासन

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पार्थिवाचे आज अंत्यदर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,” त्यांचं कर्तृत्व हे अभिमान वाटण्यासारखं आहे. दुर्दैवाने ते आपल्यामधून लवकर निघून गेले. व्यक्तीश: माझ्यासह तमाम महाराष्ट्राच्या जनतेकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. पुढे बोलत असताना ते म्हणाले की, नितीन देसाई यांच्या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल. (Nitin Desai death)

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Art Director Nitin Chandrakant Desai) यांनी  बुधवारी (दि.२) आपले जीवन संपवले. त्यांच्या निधनाने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एकच खळबळ उडाली. कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत त्यांनी आपले जीवन संपवले .तिथे ते मृतावस्थेत सापडले होते. आज (दि.४) सायंकाळी ४ वाजता एन. डी. स्टुडिओ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मनोरंजन, राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रांसह विविध क्षेत्रातील लोक येत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,”त्यांचे विविध क्षेत्रातील लोकांशी जवळचे संबंध होते. आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत. पुढे बोलत असताना ते म्हणाले की, नितीन देसाई यांच्या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल. याबाबत काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे. यात कोणीही राजकीय हस्तक्षप केला जाणार नाही. जो कोणी असेल तर त्याला कायद्यानुसार कडक शिक्षा होईल. देसाई यांच्या स्टुडिओवर कब्जा करण्याकरिता जोरजबरदस्ती करण्याचा तसेच त्यांना व्याजात फसविण्याचा प्रकार झाला का. त्यांच्यावर काही मानसिक दबाव घालण्यात आला होता का? आदी गोष्टींची सरकार नक्कीच चौकशी करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. (Nitin Desai death) 

हे ही वाचा :

Back to top button