Devendra Fadnavis : नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध | पुढारी

Devendra Fadnavis : नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध

पुढारी ऑनलाईन डेस्क

ड्रग्ज प्रकरणी मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मलिकांचे सर्व आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावलेत. मलिकांचे आरोप हास्यास्पद आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा आणि माझा फोटो ट्विटरवर शेअर केला. चार वर्षापूर्वीचा फोटो उकरुन काढणाऱ्या मलिकांची मानसिकता समजली, असे सांगत नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचे पुरावे पवारांना देणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला.

ड्रग्ज प्रकरणी मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांचे कनेक्शन असल्याचा आरोप करत मलिक यांनी कारागृहात असलेल्या जयदीप राणांचा फोटो ट्विट केला. जयदीप राणा हा ड्रग्ज पेडलर असून त्याच्यासोबत एका फोटोत फडणवीस दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या आशीर्वादानं ड्रग्ज कारभार सुरु होता. याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली होती. त्यावर फडणवीस यांनी उत्तर देत मलिकांवर हल्लाबोल केला.

दिवाळी झाल्यानंतर मी बॉम्ब फोडणार

माझा आणि माझ्या पत्नीचा त्या व्यक्तीशी संबंध नाही. मलिकांनी केलेले आरोप लवंगी फटका आहेत. दिवाळी झाल्यानंतर मी बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. नवाब मलिक यांचा जावई ड्रग्ज प्रकरणात सापडला. या अनुषगांने मलिकांची पार्टी ड्रग्ज माफिया म्हणावी लागले, असा पलटवार त्यांनी केला. सुरुवात मलिकांनी केली, शेवट मी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाझे पाळण्याची सवय तुम्हाला आहे आम्हाला नाही, असे टोलाही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला आहे.

नीरज गुंडे कोण आहेत…?

नीरज गुंडे प्रकरणी काही पुरावे असतील कारवाई करावी. नीरज गुंडे हे कोण आहेत हे मलिकांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. माझ्यापेक्षा नीरज गुंडे हे मुख्यमंत्र्यांचे जास्त निकटवर्तीय आहेत. गुंडे यांच्याविरोधात एकही तक्रार नसल्याचा दावा फडणवीस यांनी केला. भाजपशी संबंध असलेला नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांचा दूत आहे. नीरज गुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील वाझे होता, असा आरोप मलिक यांनी केला होता.

हे ही वाचा :

Back to top button