त्या दाढीवाल्याचा व्हिडिओ नवाब मलिक यांनी केला शेअर (व्हिडिओ) | पुढारी

त्या दाढीवाल्याचा व्हिडिओ नवाब मलिक यांनी केला शेअर (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क

आर्यन खानच्या ड्रग्ज केस प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक रोज एक नवीन खुलासे करत आहेत. मंत्री मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रुझ पार्टीमध्ये उपस्थित असणाऱ्या एका दाढीवाल्याच्या नावाचा खुलासा केला होता. हा दाढीवाला फॅशन टीव्हीचा इंडियाचा हेड काशिफ खान आहे. हा ड्रग्ज माफिया आहे आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडेचा मित्र आहे, असा दावा मलिक यांनी केला आहे

या दाव्यानंतर नवाब मलिक यांनी आज दुपारी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओ विषयी ते दोन दिवसांपासून बोलत आहेत. नवाब मलिक यांनी म्हटलं होत की, क्रुझ पार्टीमध्ये काशिफ खान मेहबूबासोबत नाचत होता. या दाव्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत काशिफ खान एका मुलीसोबत डान्स करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ ज्या क्रुझवर छापेमारी झाली त्याच क्रुझवरील असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

‘होय मी भंगारवाला! एक एक नटबोल्ट काढून भट्टीत टाकणार’

ड्रग्ज प्रकरणी पुन्हा एकदा मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज शुक्रवारी आरोपांच्या फैरी झाडल्या. भाजपचे मोठे मोठे नेते एनसीबीच्या कार्यालयात जातात. भाजपचे राईट हँड समीर वानखेडेंना भेटतात, असे अनेक गंभीर आरोप करत मलिक यांनी हिंवाळी अधिवेशनात मोठी नावे समोर येणार असल्याचा इशारा दिला. काशिफ खानचे ड्रग्जचे धंदे असून काशिम खान हा समीर वानखेडेंचा मित्र आहे. काशिफ खानची पार्श्वभूमी ड्रग्ज रॅकेटची आहे. काशिफ खान यांच्यावर कारवाई करण्यास समीर वानखेडे यांनी रोखलं. काशिफला अटक केल्यानंतर भाजपचं पितळ उघडं पडेल, असा दावा त्यांनी केला आहे.

निरपराध लोक तुरुंगातून बाहेर येतील. तेव्हाच पिक्चरचा शेवट होईल. होय मी भंगारवाला आहे. मी गोल्ड स्मगलर नाही. या शहरातील एकेक भंगाराचा एक एक नटबोल्ट काढून भट्टीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिला आहे.

आर्यन खानला नेणारी व्यक्ती आता जेलमध्ये आहे. घोसावी आणि भाजपची पार्टनरशीप आहे, असा आरोपही त्यांनी केला. समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावर टाकला. पण आताच्या पत्नीच्याबद्दल कसलीही टिप्पणी केली नाही. माझी लढाई कुटुंब अथवा धर्माविरोधात नाही. तर अन्यायाविरोधात आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे.

हेही वाचलत का?

Back to top button