Sanjay Raut On BJP : आमच्‍या हातातही दगड आहे : संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut On BJP : आमच्‍या हातातही दगड आहे : संजय राऊत

मुंबई : पुढारी ऑनलाईन

भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर विरोधी पक्ष नेत्‍यांविरोधात करत आहे. महाराष्‍ट्राने यापूर्वी तपास यंत्रणांचा असा गैरवापर कधीच पाहिलेला नाही. ज्‍यांची घरे काचेची असतात त्‍यांनी दुसर्‍यांच्‍या घरावर दगडफेक करु नये. आमच्‍याविरोधात दगडफेक कराल तर आमच्‍या हातातही दगड आहे. वेळच आवरा, अन्‍यथा तुमच्‍याही घराच्‍या काचा फुटतील, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut On BJP )यांनी आज विरोधकांना दिला. राजकारणामध्‍ये आरोप – प्रत्‍यारोप होत असतात. मात्र भाजपचे नेत्‍यांनी शरद पवारांवर टीका करताना भाजप नेत्‍यांना लाज वाटली पाहिजे. महाराष्‍ट्रात अशा प्रकरणाची चिखलफेक होवू नये. भाजपच्‍या नेत्‍यांचे वागणं अयोग्‍य आहे, असे मतही त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

(Sanjay Raut On BJP )मलिकांनी ज्‍यांच्‍यावर आरोप केलेत त्‍यांनी खुलासा करावा

नवाब मलिक यांच्‍या जावयावर निराधार आरोप करण्‍यात आले. त्‍यांना आठ महिने तुरुंगात रहावे लागले. याचा परिणाम अल्‍पसंख्‍यांक मंत्री नवाब मलिक यांच्‍या कुटुंबीयांवर झाला. नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्‍यावर केलेले आरोप गंभीर आहेत. ज्‍यांच्‍यावर आरोप झालेत त्‍यांनी खुलासा करावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

आमच्‍यासाठी सर्व धर्म सारखेच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप यांची भेट घेतली. यामध्‍ये चुकीचे असे काहीच नाही. या देशाची परंपरा सर्वधर्मीयांचा आदर करण्‍याची आहे. मात्र अन्‍य राजकीय पक्षांच्‍या नेत्‍यांनी ही भेट घेतली असती तर भाजपने तत्‍काळ याचा विरोध केला. सर्वधर्मीयांचा आदर करा, असा संदेशच पंतप्रधान मोदी यांनी आपल्‍या समर्थकांना दिला आहे. आता त्‍यांच्‍या समर्थकांनी या संदेशाचे पालन करावे, असेही राऊत म्‍हणाले.

हेही वाचलं का?

 

 

 

Back to top button