Indian Rock Python : मुंबईतील टॉवरच्या १३ व्या मजल्यावर ‘अजगर’ आढळल्याने खळबळ  | पुढारी

Indian Rock Python : मुंबईतील टॉवरच्या १३ व्या मजल्यावर 'अजगर' आढळल्याने खळबळ 

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील घाटकोपर (पश्चिम) येथील एका टॉवरच्या १३ व्या मजल्यावरच्या टेरेसवर चक्क चार फूट लांबीचा भारतीय अजगर (Indian Rock Python) आढळला आणि परिसरात एकच चर्चा आणि गोंधळ सुरु झाला. प्राणीप्रेमींनी त्याला शिताफीने वाचवले आहे. त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. टॉवरपर्यंत अजगर एवढ्या उंचावर कसा पोहोचला? अशी चर्चा स्थानिक रहिवाशांमध्ये होत आहे. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. (Indian Rock Python)

Indian Rock Python : १३ व्या मजल्यावर अजगर!

मुंबईतील एका आयटी फर्मसाठी काम करणारे प्राणीप्रेमी सूरज साहा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “मंगळवारी (दि.२५) घाटकोपर (पश्चिम) येथील एलबीएस रोडवरील व्रज पॅराडाईज इमारतीच्या टेरेसवर भारतीय अजगर दिसला.  या गच्चीवर काही बांधकाम सुरू होते. अजगर सिमेंटने पूर्णपणे भरलेला. एवढ्या मोठ्या सरपटणाऱ्या अजगराला वाचवण्यासाठी आम्ही तातडीने राज्याच्या वनविभागाला कळवले होते.”

Indian Rock Python
Indian Rock Python

साहा पुढे म्हणाले की, “संरक्षित वन्यजीव प्रजाती असलेल्या अजगराला वाचवण्यासाठी मुंबई परिक्षेत्राचे वन अधिकारी राकेश भोईर यांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. अजगर निदर्शनास आल्यानंतर कोणीही त्याला इजा करण्याचा प्रयत्न केला नाही, ही एक चांगली बाब आहे.

म्हणून येतात सरपटणारे प्राणी

वन्यजीव तज्ज्ञांनी सांगितले की, अतिवृष्टीमध्ये अजगर आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाणी शिरते, त्यामुळे ते इतर ठिकाणी निवारा शोधत असतात. त्यामुळेच कदाचित येथे हा अजगर आला असावा. ते असेही म्हणाले की, “भारतीय रॉक अजगर जंगली भागात त्यांच्या उल्लेखनीय गिर्यारोहण क्षमतेसाठी ओळखले जातात, सहजतेने झाडे आणि अगदी खडकाच्या पृष्ठभागावर मापन करतात.

हेही वाचा 

Back to top button