दादर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब असल्याचा पुणे पोलिसांना कॉल, आरोपी अटकेत

दादर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब असल्याचा पुणे पोलिसांना कॉल, आरोपी अटकेत
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने फोन करून दादर जंक्शन रेल्वे स्टेशनवरती बॉम्ब आहे, अशी खोटी माहिती दिली होती. मात्र, या प्रकरणामुळे खळबळ उडाल्याने पोलिसांनी गांभीर्याने या घटनेचा तपास करत आरोपी योगेश शिवाजी ढेरे ( वय -35, राहणार -, पुणे) याला अटक केली आहे. याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलीस हवलदार प्रशांत प्रकाश सुतार यांनी आरोपी विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 16 जुलै रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश ढेरे यानी त्याच्या मोबाईलवरून पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. फोनवर त्याने दादर जंक्शन रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब आहे, अशा प्रकारची माहिती दिली. पोलिसांनी कॉलची शहानिशा केल्यानंतर हा कोणी तरी संभ्रम पसरविण्यासाठी कॉल केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर आलेल्या नंबरवरून संबंधीत मोबाईलधारकाचा शोध घेऊन योगेश ढेरे याला अटक केले. पोलिसांनी केलेल्या तपासात सात ते आठ वर्षांपूर्वी आरोपी योगेश याचा अपघात झाला होता. त्यामुळे त्याची प्रकृती अस्थिर असून तो लोणी काळभोर परिसरात एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. हॉटेलमध्ये काम करताना त्याने त्याठिकाणी बॉम्ब फुटणार आहे, अशी बतावणी केली म्हणून त्याला कामावरून काढून टाकले होते. याबाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस खैरनार करत आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news