Maharashtra Monsoon Session 2023 : विधान परिषद उपसभापती अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत गदारोळ | पुढारी

Maharashtra Monsoon Session 2023 : विधान परिषद उपसभापती अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत गदारोळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पक्षांतराच्या मुद्दयावर त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी विरोधकांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही गोऱ्हे यांच्या उपसभापतिपदालाच विरोधकांनी आक्षेप घेतल्याने विधानपरिषदेत प्रचंड गदारोळ झाला. या मुद्द्यावरून शेकापचे जयंत पाटील विधानपरिषदेत चांगलेच आक्रमक झाले होते.

पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधीमंडळाचे कामकाज सुरू झाल्यानंतर अपात्र मुद्द्यावरून विधानपरिषदेत प्रचंड गदारोळ झाला. शेकापचे जयंत पाटील विधानपरिषदेत आक्रमक झाले होते. त्यांनी नीलम गोऱ्हे, कायंदे आणि बाजोरियांना यांना अपात्र करण्याची मागणी केली.

सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाजाला सुरुवात होताच शेकापचे जयंत पाटील यांनी नीलम गो-हे यांच्या उपसभापतिपदावरच आक्षेप घेतला होता. विधान परिषदेच्या सभापतिपदावर बसलेल्या व्यक्तीचा कुठलाही पक्ष नसतो. त्यांचे पक्ष सदस्यत्व जाते. माझ्याकडे संसदेचे सगळे नियम आहेत, असे सांगत त्यांनी चर्चेची मागणी केली होती.

हेही वाचा : 

Back to top button