Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर बसवणार सीसीटीव्ही; वेगवान वाहनांना देणार अलर्ट

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर बसवणार सीसीटीव्ही; वेगवान वाहनांना देणार अलर्ट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्धी महामार्गावर अपघात होणार नाहीत यासाठी स्मार्ट सिस्टीम कार्यान्वीत करण्यात येणार आहे. महामार्गावर सीसीटीव्ही क‌ॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे जास्त वेगाने निघालेले वाहन थांबविण्यात येईल किंवा अशा वाहनांना अलर्ट दिला जाईल. याबाबतचे काम सुरू असून त्याला कदाचित वेळ लागू शकतो, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१) माध्यमांशी बोलताना दिली.

बुलढाणा जिल्ह्यातील बस अपघातानंतर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा अतिशय भीषण आणि दुर्देवी अपघात झाला आहे. डीझेलची टाकी फुटल्याने आग लागली. यामध्ये २५ लोक मृत्यूमुखी पडले तर ८ लोक वाचली आहेत. जखमींवर डॉक्टरांनी उपचार केले आहेत. जखमींमध्ये एकही गंभीर नाही. अपघातात मृतदेह जळून खाक झाले आहेत. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागणार आहे. तशा सुचना देण्यात आल्या आहेत. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत करण्याचा निर्णय झाला आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार आहे. ही घटना गंभीर असून पोलिस चौकशी करत आहेत. बसचा ड्रायव्हर वाचला असून त्याची चौकशी सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान,

समृद्धी महामार्गावर अपघात होणार नाहीत यासाठी स्मार्ट सिस्टीम बसविण्यात येणार आहे. या रोडवर वाहनांचे स्पीड जास्त असते, लोक गाडी वेगाने चालवतात पण त्यायोग्य गाड्या नसतात. त्यासाठी प्रबोधन करावे लागणार आहे. पण यासाठी वेळ लागू शकतो. तोपर्यंत टोलनाक्यावर चालकांच प्रबोधन कसं करता येईल हे पाहत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news