आमदार निलेश लंके यांचा पलटवार !राष्ट्रवादीचं संख्याबळ 12 वर पोहोचल्याचा समर्थकांचा दावा | पुढारी

आमदार निलेश लंके यांचा पलटवार !राष्ट्रवादीचं संख्याबळ 12 वर पोहोचल्याचा समर्थकांचा दावा

पारनेर प्रतिनिधी :  पारनेर नगराध्यक्ष निवडणुकीत नाट्यमय घडामोडी सुरू असून राष्ट्रवादीकडे केलेल्या गट नोंदणीत 11 सदस्य होते. त्यातील दोन विखे समर्थकांकडे गेल्या ने 9 सदस्य होते तर त्यात शिवसेनेच्या 3 सदस्यांची भर पडली असून राष्ट्रवादीचे संख्याबळ 12 झाल्याचा दावा राष्ट्रवादी समर्थकांनी केला आहे. हे सर्व नगरसेवक अज्ञात स्थळी हलवण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.
पारनेर नगरपंचायत 17 नगरसेवक आहेत. त्यापैकी 12 नगरसेवक राष्ट्रवादीच्या दाखल झाल्याची माहिती समोर येत असून त्या नगरसेवकांचे राष्ट्रवादीसोबत छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार निलेश लंके यांच्या सूचनेने नगरसेवक नितीन अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार विखे यांची समर्थक नगरसेवक युवराज पठारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत या निवडणुकीत रंगत आणली.  राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी राजकीय कसब वापरत 9 नगरसेवक असताना शिवसेनेचे 3 नगरसेवक गळाला लावले. या बारा नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले.

शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी समर्थक तीन नगरसेवक सुरुवातीला राष्ट्रवादीच्या व विखे समर्थकांच्या गटात सहभागी नव्हते. मात्र रात्री उशिरा हे तीनही नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्याची चर्चा आहे. आमदार निलेश लंके यांच्या गटात असणारे नगरसेवक नितीन अडसूळ योगेश मते भूषण शेलार सुरेखा भालेकर विद्या कावरे हिमानी नगरे प्रियंका औटी सुप्रिया शिंदे नीता औटी यासोबत शिवसेनेचे नगरसेवक जायदा शेख शालुबाई ठाणगे नवनाथ सोबले भाजप शिवसेना गटातील नगरसेवक युवराज पठारे सोबत शिवसेनेचे नीता ठुबे विद्या गंधाडे राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी भाजपचे नगरसेवक अशोक चेडे असे पाच नगरसेवक आहेत.

राष्ट्रवादीच्या 12 नगरसेवकांच्या दाव्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केलेल्या नितीन अडसूळ यांचा नगराध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जाते. विखे समर्थक नगरसेवक युवराज पठारे याच्या अडचणीत वाढ झाली आहे यांच्याकडे पाच नगरसेवक असून राष्ट्रवादीच्या गोटातील नगरसेवक मतदानावेळी पठारे यांना मतदान करतील का आमदार नीलेश लंके यांनी केलेल्या पलटवारावर खासदार डॉ.सुजय विखे यांची भूमिका याची उत्सुकता आहे.

हे ही वाचा :  

नाशिक शहरात झळकले गुलशनाबादचे फलक, नव्या वादाला तोंड

राज्याबाहेरील कन्नडिगांना कर्नाटक पुरवणार सुविधा; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे आदेश

 

Back to top button