Shinde - Fadnavis government : राज्य मंत्रिमंडळाचा जुलैमध्ये विस्तार; शिंदे - फडणवीस यांचे संकेत | पुढारी

Shinde - Fadnavis government : राज्य मंत्रिमंडळाचा जुलैमध्ये विस्तार; शिंदे - फडणवीस यांचे संकेत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार (Maharashtra Cabinet expansion) हा जुलै महिन्यात करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन परतल्यानंतर त्यांनी हे संकेत दिले आहेत. 17 जुलैपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्यापूर्वीच हा विस्तार होण्याची शक्यता आहे. ( Shinde – Fadnavis government)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी रात्री दिल्लीत गेले होते. त्यांनी अमित शहा यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये राज्य व केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार हा प्रमुख विषय होता. राज्यात परतल्यानंतर दोघांनीही राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिले. ( Shinde – Fadnavis government)

मुख्यमंत्री म्हणाले की, (Maharashtra Cabinet expansion) मंत्रिमंडळ विस्तार आम्हाला करायचा आहे. त्यामध्ये असलेले सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. आता लवकरच विस्तार केला जाईल. देवेंद्र फडणवीस यांनी तर जुलै महिन्यातच विस्तार होणार असल्याचे सांगितले. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा काहीही संबंध नाही.

केंद्राचा विस्तार कधी होणार हे आम्हाला माहिती देखील नाही. आमचा राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्त रस आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet expansion)  केला जाईल. जुलै महिन्यातच तो होऊ शकतो, असे फडणवीस म्हणाले. दिल्लीत घेतलेल्या गाठीभेटी या केवळ मंत्रिमंडळ विस्तार एवढ्यासाठी झाल्या नाहीत. राज्यातील अनेक प्रश्न असतात त्यासाठी केंद्राची भेट घ्यावी लागते. सतत पाठपुरावा करावा लागतो, राज्याच्या विषयासंदर्भात अनेकवेळा बैठका असतात. त्यामुळे केंद्रात जावे लागते, असेही फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet expansion) फॉर्म्युला ठरल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच दोन्ही पक्षाची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यात भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी चार ते पाच नेत्यांचा समावेश असेल.

               हेही वाचा : 

 

Back to top button