

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि.२९) रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. रात्री उशिरा पर्यंत चालेल्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बैठकी दरम्यान कुणाला मंत्रीपद द्यायचे याचा निर्णय सर्वस्वी शिंदेंवर सोडण्यात आल्याचे कळते. शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची ही चर्चा आहे. बैठकीनंतर शिंदे-फडणवीस रात्रीच मुंबईला परतले. (Cabinet Expansion)