बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी ‘आयआरएस’ अधिकारी सचिन सावंत यांना अटक | पुढारी

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी 'आयआरएस' अधिकारी सचिन सावंत यांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमाशुल्क आणि जीएसटी विभागात कार्यरत अधिकारी  सचिन सावंत यांना उत्तर प्रदेशमधील लखनाै येथे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. त्‍यांच्‍या मुंबईतील निवासस्थानी धाड टाकली असून, त्याचबरोबर त्यांच्या काही नातेवेईकांचीही चौकशी सुरु असल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. (IRS Sachin Sawant)

विशेष म्‍हणजे ‘आयआरएस’ सचिन सावंत हे यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय मुंबई येथे कार्यरत हाेते. यानंतर त्‍यांची नियुक्‍ती लखनाै येथे झाली.  सावंत यांना लखनऊहून मुंबईत चौकशीसाठी आणले जात असल्‍याचे सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा :  

Back to top button