Share Market News | शेअर बाजारात खरेदीची लाट, सेन्सेक्स, निफ्टीने गाठला नवा उच्चांक | पुढारी

Share Market News | शेअर बाजारात खरेदीची लाट, सेन्सेक्स, निफ्टीने गाठला नवा उच्चांक

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या शेअर बाजारातील वाढीचा मागोवा घेत आज बुधवारी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) ने तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात बेंचमार्क निफ्टी ५० ने १८,९४५ वर जात सर्वकालीन उच्चांक गाठला तर सेन्सेक्सने ६३,८३१ वर झेप घेतली. सेन्सेक्सचा हा नवा विक्रमी उच्चांक आहे. सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात ४१५ अंकांनी वाढून व्यवहार केला. सकाळी साडे अकराच्या सुमारास सेन्सेक्स ४१५ अंकांनी वाढून ६३,८३१ वर होता. तर निफ्टी १२९ अंकांच्या वाढीसह १८,९४७ वर व्यवहार करत होता. (Share Market News)

सर्व क्षेत्रात हिरव्या चिन्हात व्यवहार सुरु आहेत. सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, एसबीआय, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, टायटन आणि आयटीसी हे शेअर्स वाढले. तर पॉवर ग्रिड, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक हे घसरले. क्षेत्रीयमध्ये निफ्टी मेटल ०.९९ टक्के, निफ्टी PSU बँक ०.६० टक्के वाढला. फायनान्सियल, ऑटो, एफएमसीजी, आयटी, मीडिया, रियल्टी, कन्झूमर ड्युरेबल्स, ऑइल आणि गॅस हेदेखील वधारले आहेत.

अदानी समूहातील अदानी एंटरप्रायझेसचा शेअर्स निफ्टीवर सर्वाधिक ४.६ टक्के वाढला. दरम्यान, निफ्टी स्मॉलकॅप ५० हा ०.६९ टक्क्यांनी, निफ्टी स्मॉलकॅप १०० हा ०.६१ टक्क्यांनी, निफ्टी स्मॉलकॅप ३५० हा ०.५८ टक्क्यांनी वाढला आणि निफ्टी मिडस्मॉलकॅप ४०० हा ०.५१ टक्क्यांनी वधारला.

आशियाई बाजारांमध्ये (Asian markets) टोकियोतील निर्देशांक हिरव्या चिन्हात तर सेऊल, शांघाय आणि हाँगकाँगमधील बाजारात घसरण दिसून येत आहे. मंगळवारी अमेरिकन बाजारात तेजी राहिली होती.

NSE डेटानुसार, मंगळवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २,०२४ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची निव्वळ खरेदी केली, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी १,९९१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. (Share Market News)

हे ही वाचा :

Back to top button