Share Market Closing | सेन्सेक्स ४४६ अंकांनी वाढून बंद, गुंतवणूकदारांना १.५० लाख कोटींचा फायदा | पुढारी

Share Market Closing | सेन्सेक्स ४४६ अंकांनी वाढून बंद, गुंतवणूकदारांना १.५० लाख कोटींचा फायदा

पुढारी ऑनलाईन : संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) आज मंगळवारी तेजीत व्यवहार केला. याआधीच्या तीन सत्रांत घसरण झाली होती. पण दोन्ही निर्देशांक आज वधारुन बंद झाले. सर्व क्षेत्रात खरेदी दिसून आली. मुख्यतः बँकिंग, फायनान्सियल, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये अधिक तेजी राहिली. सेन्सेक्स आज ४४६ अंकांनी वाढून ६३,४१६ वर बंद झाला. तर निफ्टी १२६ अंकांच्या वाढीसह १८,८१७ वर स्थिरावला. आज सुमारे १,९६५ शेअर्स वाढले, तर १,४२० शेअर्समध्ये घसरण झाली आणि १३८ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. (Share Market Closing)

बाजारातील तेजीमुळे आज गुंतवणूकदारांना १.५० लाख कोटींचा फायदा झाला. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज २७ जून रोजी २९२.१६ लाख कोटींवर पोहोचले. याआधी २६ जून रोजी हे बाजार भांडवल २९०.६७ लाख कोटी होते. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज १.४९ लाख कोटींनी वाढले.

सेन्सेक्स आज ६३,१५१ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने ६३,४०० अंकांवर झेप घेतली. सेन्सेक्सवर आज एचडीएफसी, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, एसबीआय, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, इन्फोसिस, सन फार्मा, पॉवर ग्रिड हे शेअर्स वाढले. तर इंडसइंड बँक, मारुती, आयटीसी हे शेअर्स घसरले. HDFC Life हा शेअर ५.८६ टक्के वाढून ६६७ रुपयांवर पोहोचला.

सॅफायर फूड्स इंडियाचे (Shares of Sapphire Foods India) शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात ४ टक्क्यांनी वाढले. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, प्रमोटर ब्लॉक डीलद्वारे ३ दशलक्ष शेअर्स विकण्याची शक्यता आहे. प्रति शेअरची फ्लोअर प्राइस १,३४५-१,३९१ रुपये आहे. यामुळे सॅफायर फूड्सचे शेअर्स वधारले.

‘टाटा’ कंपनीच्या IPO ला सेबीची मंजुरी

तब्बल १९ वर्षानंतर टाटा समुहातील (Tata Group) आणखी एक कंपनी बाजारात सूचीबद्ध होण्यासाठी सज्ज झाली आहे. बाजार नियामक सेबीने (Markets regulator Sebi) टाटा टेक्नॉलॉजीजच्या (Tata Technologies) इनिशिअल पब्लिक ऑफर (IPO) ला मान्यता दिली आहे. जवळपास दोन दशकांनंतर टाटा समुहाचा येत असलेला हा पहिला आयपीओ असणार आहे.

एचडीएफसीच्या शेअर्सबाबत महत्त्वाची अपडेट

HDFC चे HDFC बँकेत विलीनीकरण १ जुलैपासून अंमलात येणार आहे. पण HDFC च्या शेअर्सचे ट्रेडिंग १३ जुलैपासून HDFC बँकेच्या अंतर्गत सुरू होईल. १२ जुलै हा HDFC स्टॉकसाठी शेवटचा ट्रेडिंग दिवस असेल. कारण तो १३ जुलै रोजी डीलिस्ट केला जाईल, असे एचडीएफसीकडून आज जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज एचडीएफसीचे दोन्ही शेअर्स सुमारे १ टक्क्यांहून अधिक वधारले होते. (Share Market Closing)

NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (Foreign institutional investors) सोमवारी ४०९ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २५० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

जागतिक बाजारातील स्थिती

चीनच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणेबद्दल चिंता, रशियातील संघर्ष या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात आज डळमळीत स्थिती राहिली. MSCI चा जपानबाहेरील एशिया पॅसिफिकमधील स्टॉक्स ०.०८ टक्के वर होते. जपानचा बेंचमार्क निक्केई १ टक्के घसरला, तर चीनचा शांघाय कंपोझिट ०.९३ टक्के वाढला. अमेरिकेच्या शेअर बाजारातील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज (Dow Jones Industrial Average) ०.०४ टक्के घसरला. तर S&P 500 निर्देशांक ०.४५ टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट (Nasdaq Composite) १.१६ टक्के खाली आला.

कच्च्या तेलाच्या दरात वाढ

रशियामधील राजकीय अस्थिरता आणि संभाव्य पुरवठ्यातील व्यत्यय या चिंतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती (Oil prices) मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात वाढल्या. ब्रेंट क्रूड फ्युचर्स ६ सेंटने वाढून प्रति बॅरल ७४.२४ डॉलर झाले, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) फ्युचर्स १० सेंटने वाढून प्रति बॅरल ६९.४७ डॉलर झाले. सोमवारी, ब्रेंट ०.५ टक्के आणि WTI ०.३ टक्के वाढले होते.

हे ही वाचा :

Back to top button