मुंबई महापालिकेतील खरेदी प्राधिकरणाच्या कार्यालयात ईडीचा छापा | पुढारी

मुंबई महापालिकेतील खरेदी प्राधिकरणाच्या कार्यालयात ईडीचा छापा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेमध्ये खरेदी करण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूंच्या निविदा भायखळा येथील पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाच्या माध्यमातून काढण्यात येतात. त्यामुळे ईडीने या कार्यालयावर गुरुवारी सकाळी छापा मारून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. या कार्यालयात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

कोविड काळात विविध उपाययोजनांसाठी खरेदी करण्यात आलेली वैद्यकीय उपकरणे व अन्य वस्तू तसेच मुंबई महापालिकेत लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी पालिकेचे मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण निविदा प्रक्रिया राबवते. या खात्याची जबाबदारी पूर्वी उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्याकडे होती. बुधवारी उपायुक्त बिरादार यांच्या घरी ईडीने छापा मारल्यामुळे खरेदी प्राधिकरणाच्या कार्यालयातही छापा मारला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर गुरूवारी सकाळी ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी खरेदी प्राधिकरणाच्या कार्यालयात छापा मारला. सध्या या प्राधिकरणामार्फत कोरोना काळात खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंच्या कागदपत्रांची तपासणी ईडी अधिकाऱ्यांमार्फत सुरू असल्याचे समजते.

हेही वाचा : 

Back to top button