Sensex hits record high | सेन्सेक्सनं इतिहास रचला, गाठला नवा उच्चांक! निफ्टीचीही उसळी | पुढारी

Sensex hits record high | सेन्सेक्सनं इतिहास रचला, गाठला नवा उच्चांक! निफ्टीचीही उसळी

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातून कमकुवत संकेत असतानाही आज बुधवारी भारतीय शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून येत आहे. सेन्सेक्सने आज नवा उच्चांक गाठत ६३,५८८ वर व्यवहार केला. तर निफ्टीही उच्चांकाजवळ १८,८२० वर व्यवहार करत आहे. बाजारातील तेजीत रिलायन्स, टीसीएस आणि एचडीएफसीचे शेअर्स आघाडीवर आहेत. (Sensex hits record high)

आज सेन्सेक्स २६० अंकांनी वाढून ६३,५८८ वर पोहोचला. हा सर्वकालीन उच्चांक आहे. याआधी १ डिसेंबर २०२२ रोजी सेन्सेक्सने ६३,५८३ अंकावर व्यवहार केला होता. दरम्यान, निफ्टी ५० ने आज १८,८७० वर झेप घेतली. याआधीचा निफ्टीचा सार्वकालीन उच्चांक १८,८८७ चा आहे. निफ्टी या सार्वकालीन उच्चांकापासून अगदी जवळ आहे.

शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) बुधवारी (दि. २१) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २३० अंकांनी वाढून ६३,५५० वर तर निफ्टी १८,८५० वर होता. बहुतांश आशियाई बाजार ला

काल सेन्सेक्स ६३,३२७ वर बंद झाला होता. आज तो ६३,४६७ वर खुला झाला. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक, विप्रो, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, एलटी, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स वाढले आहेत. तर टाटा स्टील, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, टाटा मोटर्स, मारुती, बजाज फायनान्स, इन्फोसिस, आयसीआयसीआय हे शेअर्स घसरले आहेत. (Stock Market Opening)
श्रीराम फायनान्स आणि पिरामल एंटरप्रायझेसचे शेअर्स १० टक्के अप्पर सर्किट्सवर खुले झाले. कारण पिरामल एंटरप्रायझेसकडून कंपनीतील संपूर्ण ८.३४ टक्के भागभांडवल ब्लॉक डीलद्वारे विकण्याची शक्यता आहे.

क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी ऑटो ०.६१ टक्के आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस ०.५१ टक्के वाढले. बँका, एफएमसीजी, आयटी, मीडिया, रिअल्टी आणि consumer durables ही वाढून व्यवहार करत आहेत. (Sensex hits record high)

मीडिया, रिअल्टी स्टॉक्स आज सर्वाधिक वाढले आहेत. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २ पैशांनी घसरून ८२.११ वर आला.

 हे ही वाचा :

Back to top button