अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. त्यांनी आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो आणि त्यांचा दाखला ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा अशी कॅप्शन लिहून त्यांनी समीर वानखेडे यांचा दाखला ट्विट केला आहे. त्याचबरोबर त्यांनी Pehchan kaon? म्हणून समीर वानखेडे यांचा एक जुना लग्नातील क्रॉप केलेला फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो ग्रुपमधील असल्याचे लक्षात येते.
क्रांती रेडकरने ट्विट करत म्हटले आहे की, मी आणि माझे पती समीर जन्माने हिंदू आहोत. आम्ही इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर केलेलं नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीर यांचे वडील सुद्धा हिंदू होते आणि त्यांनी माझ्या मुस्लीम आईशी विवाह केला ती सध्या जिवंत नाही. समीर यांचा पहिला विवाह स्पेशल मॅरिज ॲक्टनुसार झाला. त्यांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. हिंदू विवाह कायद्यानुसार आमचे २०१७ मध्ये विवाह झाला.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या दाखल्यावरून चर्चा सुरु झाली आहे. दाखला सोशल मीडियात व्हायरल होऊ लागल्याने समीर वानखेडे प्रचंड संतापले आहेत.
व्हायरल होत असलेल्या दाखला खोटा असून, या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. समीर वानखेडे यांनी तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल तर ती घेण्यासाठी माझ्या मूळ गावी वरुड तोफा, ता. रिसोड जि.वाशिम येथे जा आणि तपासा असे सांगितले.
समीर ज्ञानदेव वानखेडे यांच मुळं गाव वाशिम जिल्ह्यातील वरुड तोफा हे असून या गावात त्यांची वडिलोपार्जित जमीन व घर आहे. सध्या त्यांचे काका शंकरराव कचरूजी वानखेडे हे सेवानिवृत्त आहे. ते सध्या वाशिम शहरातील लाखाळा परिसरात वास्तव्यास आहेत.
दरम्यान, त्यांच्या घरी जाऊन समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे यांचे मूळ कागदपत्रे पाहिली असता त्यांचे जातीचे प्रमाणपत्र हे अनुसूचित जातीचे असल्याचे स्पष्ट झाले.
माझा भाऊ ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे मुंबईला लोखंडवाला परिसरात राहत असल्याने त्यांना टोपण नाव दिल असेल, मात्र हे राजकिय आरोप आहेत. माझ्या भावाचं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हेच तर पुतण्याचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे हेच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचलं का?