"ती धमकी नाही म्हणणं हे बावनकुळे तुम्हाला पटतं का?" : अजित पवार | पुढारी

"ती धमकी नाही म्हणणं हे बावनकुळे तुम्हाला पटतं का?" : अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट‌्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या धमकीसंदर्भात भाजपने आपली चूक मान्य करावी. सौरभ पिंपळकरने धमकी दिलेली नाही, असं बावनकुळे यांनी म्हणणं याला काही अर्थ नाही. तुम्हाला तुमचा दाभोळकर करू म्हटलं तर ती धमकी नाही म्हणणं तुमच्या सद्सदविवेकबुद्धीला पटत का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. आज राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापन दिन आहे, या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, ” चंद्रशेखर बावनकुळें सारख्या व्यक्तींकडून हे बोलणं मान्य नाही. त्यांनी मान्य केलं पाहिजे की, आमच्या माणसाकडून चुकलं, हे अस होता कामा नये. याच्यात महाराष्ट्राची संस्कृती सांभाळली पाहिजे. मतमतांतर असू शकतात पण आज यांचे कार्यकर्ते बोलले तर दुसऱ्या पक्षाचेही कार्यकर्ते बोलतील. त्यामुळे विकासाचे महत्वाचे प्रश्न आणि समस्या बाजूला राहतील आणि नको त्या विषयाला वळण लागेल. बावनकुळेंना माझा फोन झाला तर मी स्वत: त्यांच्याशी बोलणार आहे. तुम्ही काय बोलता, तुम्हाला तुमचा दाभोळकर करू म्हटलं तर ती धमकी नाही म्हणणं तुमच्या सद्सदविवेकबुद्धीला पटत का?” असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button