मुंबई, पुढारी वृत्तसेवा : Beeper Joy Cyclone : अरबी समुद्रात खोलवर तयार झालेल्या 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हे वादळ महाराष्ट्र, गोवा, केरळ व कर्नाटक या चार राज्यांत धुमाकूळ घालू शकते. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात खोलवर सोमवारी सायंकाळी 'बिपरजॉय' चक्रीवादळ वेगाने तीव्र झाले. मंगळवार सकाळपर्यंत या चक्रीवादळाचा वेग वाढत गेला आणि ते आग्नेय अरबी समुद्रावर येऊन धडकले. हे चक्रीवादळ सध्या गोव्याच्या पश्चिम नैर्ऋत्य किनार्यापासून 920 किमी अंतरावर आहे. तर, मुंबईच्या दक्षिण-नैर्ऋत्यपासून 1120 किमी अंतरावर असल्याची माहिती पुण्याचे हवामान विभाग प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. Beeper Joy Cyclone
या चक्रीवादळामुळे चार दिवस उशिरा येणारा मान्सून मुंंबईत लवकर येण्याची शक्यता असून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढेल. मात्र विदर्भ मराठवाड्यात कमी पाऊस राहील, असा प्राथमिक अंदाज आहे.