Train Accident Coromandel Express : कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात ५० प्रवासी ठार, २०० पेक्षा जास्त जखमी | पुढारी

Train Accident Coromandel Express : कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात ५० प्रवासी ठार, २०० पेक्षा जास्त जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशाच्या बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेसला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ५० जणांचा मृत्यू झाला असून २०० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. हा अपघात बालासोर आणि बहानागा रेल्वे स्टेशनजवळ झाला आहे. कोरोमंडल एक्सप्रेस आणि एका मालगाडी एक्सप्रेसमध्ये हा अपघात झाला आहे. त्यामुळे रेल्वेचे डब्बे रुळावरुन घसरले आहेत.(Train Accident Coromandel Express)

प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ५० जणांना बालासोर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्या १३२ प्रवाशांना जवळच्या विविध सीएचसीमध्ये हलवण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रेल्वे अपघाताच्या छायाचित्रांमध्ये काही प्रवासी बेशुद्धावस्थेत दिसत आहेत. एनडीआरएफचे २२ सदस्य घटनास्थळी पोहोचले आहेत. रेल्वेतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोक मदत करत आहेत. (Train Accident Coromandel Express)

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. उद्या सकाळी ते अपघातस्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदीही या अपघातामुळे हैराण झाले असून त्यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या अपघाताबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आहे. (Train Accident Coromandel Express)

हेही वाचंलत का?

Back to top button