WFI Protest : १९८३ च्या विश्वकप विजेत्या क्रिकेट संघातील खेळाडूंचा आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना पाठिंबा | पुढारी

WFI Protest : १९८३ च्या विश्वकप विजेत्या क्रिकेट संघातील खेळाडूंचा आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना पाठिंबा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सन 1983 च्या विश्वकप विजेत्या क्रिकेट संघातील खेळाडूंनी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांनी लैंगिक शोषण केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना अटक केली जावी, या मागणीसाठी मागील महिनाभरापेक्षा जास्त काळाहून कुस्तीपटूंनी आंदोलन चालविलेले आहे.
गेल्या 28 मे रोजी कुस्तीपटूंना जंतर मंतरवरून हटविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला होता. त्याचा संदर्भ देत क्रिकेटपटूंनी पैलवानांसोबतचे मारहाणीचे दृश्य व्यथित करणारे आणि त्रासदायक असल्याचे म्हटले आहे. सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करीत असलेल्या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक आदींचा समावेश आहे.
पैलवानांनी पदके नदीचा विसर्जित करण्याचा जो निर्णय घेतला होता, तो क्लेशदायक होता, असे सांगून 82 च्या विश्वकप विजेत्या संघातील क्रिकेटपटू पुढे म्हणतात की, कित्येक वर्षांचा प्रयत्न, संकल्प, बलिदान आणि धैर्यातून ही पदके खेळाडूंनी मिळवलेली आहेत. यात केवळ त्यांचा नाही तर देशाचा गौरव झालेला आहे. त्यांनी कुस्तीपटूंनी कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. सरकारकडून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल व त्यावर मार्ग निघेल, अशी आशा आहे. देशाला कायद्यानुसार इतकीच आमची अपेक्षा आहे.
……

Back to top button