Best Bakery case : बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल पुन्हा पुढे ढकलला | पुढारी

Best Bakery case : बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल पुन्हा पुढे ढकलला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गुजरातमधील बेस्ट बेकरीच्या आवारात घडलेल्या १४ जणांच्या हत्याकांडा प्रकरणाचा ( Best Bakery case) निकाल आज ( दि. ३१) मुंबईतील विशेष न्यायालयाने पुन्हा एकदा पुढे ढकलला आहे.  पुढील आदेशासाठी २ जून ही तारीख निश्चित केली आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणात एकूण चार आरोपीविरुद्ध खटला सुरु होता. यातील दोघांचा खटला सुरु असताना मृत्‍यू झाला होता.

Best Bakery case : गोध्रा जळीतकांडानंतर बेस्‍ट बेकरी हत्‍याकांड

१ मार्च २००२ रोजी वडोदरा येथील हनुमान टेकडीवरील बेस्ट बेकरीवर जमावाने हल्ला केला. गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेस जाळल्यानंतर ही घटना घडली. जमावामध्ये हर्षद सोलंकी व मफत गोहिल या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. हे दोघे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.

हत्याकांडात सहभाग असल्याच्या आरोपाखाली गेली १० वर्षे तुरुंगात असलेल्या दोघा आरोपींचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने राखून ठेवला हा निर्णय गुरूवारी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप निकालपत्र पूर्ण झाले नसल्याने सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी निकालाची सुनावणी २५  मेपर्यंत तहकूब ठेवली.

सत्र न्यायालयात एकूण चार आरोपीविरुद्ध खटला उभा राहिला होता. मात्र दोघा आरोपींचा मृत्यू झाला. सोलंकी व गोहिलविरुद्ध सरकारी पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. हे दोघे दोषी की निर्दोष, याचा अंतिम फैसला मुंबई सत्र न्यायालय देणार होते. आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने १७ जानेवारीला निकाल राखून ठेवला होता. मात्र उच्च न्यायालयाने कालमर्यादा आखून दिलेल्या प्रकरणांच्या सुनावणीमध्ये सत्र न्यायालय व्यस्त असल्याने बेस्ट बेकरी खटल्याचा निकाल लांबणीवर पडला हाेता.

हेही वाचा :

 

 

Back to top button