Sambhajiraje Chhatrapati : स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढवणार; संभाजीराजेंची मोठी घोषणा | पुढारी

Sambhajiraje Chhatrapati : स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढवणार; संभाजीराजेंची मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. आज पुणे येथे स्वराज्य संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात स्वराज्य संघटनेचा ठराव मंजूर करण्यात आला.

पुणे येथे स्वराज्य संघटनेचे आज पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी संभाजीराजेंच्या हस्ते स्वराज्य भवनाचं लोकार्पण करण्यात आले. स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुकांत उतरणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, राजकारणी आपला खेळ करायला लागले आहेत. तेच राजकारणी, तेच खोटं बोलणं आणि तीच चर्चा सुरू आहे. वेळप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संतांची नाव घेतली जातात. या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सामान्य कष्टकरी शेतऱ्यांना ताकद देण्यासाठी बाहेर पडायचं आहे. यासाठीच हे अधिवेशन आहे. आपण देशात अमृतमहोत्सव साजरा करत आहे. पण तरीही शिक्षणाची काय परिस्थिती आहे. शिक्षणाच बाजारीकरण झालं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण मोफत आणि सक्तीच केलं आता फक्त त्यांच्या धोरणावर बोललं जात आहे, असे म्हणत संभाजीराजे यांनी राजकीय धोरणांवर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : 

Back to top button