“महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत “; नितेश राणेंची जहरी टीका  | पुढारी

"महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत "; नितेश राणेंची जहरी टीका 

पुढारी ऑनलाईन डेस्क : “संजय राऊत नेमके कोणाचे आहेत हे त्यांनाच माहित नाही. ते सरड्यासारखे रंग बदलतात. आग लावण्याचं आणि काड्या करण्याचं काम करतात. महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत आहेत,” अशी जहरी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर केली.

आज (दि.२७) माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले. राणे यांनी खा. राऊत यांची तुलना थेट नृत्यांगना गौतमी पाटीलशी केली. ते म्हणाले की, “संजय राऊत रंग बदलणारा सरडा आहेत. ते उरलेली शिवसेनाही संपवतील. महाविकास आघडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत आहेत. गौतमी जशी वेगवेगळया कार्यक्रमात जाऊन लोकांच मनोरंजन करते, नाचते, लोकांना नाचवते, ती एक उत्तम कलाकार आहे. शिवाय लोकांमध्ये लोकप्रिय आहे. गौतमी पाटील मनोरंजन करत असल्याने लोकांना बघायला आवडतं. पण गौतमीसारख राऊत रोज सकाळी येऊन लोकांच मनोरंजन करतात. कोणाचीतरी सुपारी घेवून नसतं आग लावण्याच काम ते करतात. हा सकाळचा कार्यक्रम बंद झाला पाहिजे ” असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमदार खासदारांना अपमानीत करायचे. महाविकास आघाडीच्या काळात अजित पवार सर्वात कमी निधी शिवसेनेच्या आमदारांना द्यायचे,” असा आरोपही राणे यांनी केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button