पालिकेच्या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना! मालाड-मार्वे रस्ता काही तासातच खचला | पुढारी

पालिकेच्या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना! मालाड-मार्वे रस्ता काही तासातच खचला

मालाड; पुढारी वृत्तसेवा : मालाड-मार्वे रोड अचानक खचल्याने मोठा अपघात घडता घडता वाचला. मुस्लिम कबरस्थान समोरील मार्वे रोड येथे काही दिवसांपूर्वी जलवाहिनी दुरुस्तीसाठी हा रस्ता खणला होता. जवळपास पंधरा दिवसांनी रस्त्याचा हा भाग वाहतुकीसाठी सोमवारी (दि.22) दुपारी खुला केला होता. मात्र अवघ्या काही तासातच रस्ता खचल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

पेव्हर ब्लॉक रस्त्यावर सर्वत्र पसरले आहेत. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांना अपघात घडण्याची भीती वर्तवली जात आहे. तसेच पालिकेच्या निकृष्ट कामाचे उत्कृष्ट उदाहरण या घटनेनंतर समोर आले आहे. जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार की नाही? जर मोठा अपघात घडला अन् जिवीतहानी झाली तर त्याला कोण जवाबदार? मार्वे रोडवरील वाहतूक कोंडीकडे पालिकेचे उच्च अधिकारी लक्ष घालणार की नाही? असे सवाल चाकरमान्यांकडून केले जात आहेत.

हेही वाचा : 

Back to top button