Jayant Patil ED Summons : 'ईडी' चौकशीपूर्वी जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, "विरोधकांना हे साेसावे ..." | पुढारी

Jayant Patil ED Summons : 'ईडी' चौकशीपूर्वी जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, "विरोधकांना हे साेसावे ..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : “आम्ही विरोधी पक्षात आहोत. विरोधी पक्षातील लोकांना हे सोसावे लागतेच. मी ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज  ( दि.२२)  केले. ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत हाेते. (Jayant Patil ED Summons)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज (दि.२२) ‘आयएलएफएस’ प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. जयंत पाटील यांना पाठींबा दर्शवण्यासाठी  ठिकठिकाणीं फलकही लावले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ‘ईडी’ चौकशीविरोधात कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. (Jayant Patil ED Summons) या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी ट्विट करत आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

Jayant Patil ED Summons : कोणीही मुंबईला येऊ नये

जयंत पाटील यांनी आज सकाळी केलेल्‍या आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,“आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून, राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे.

हेही वाचा :

Back to top button