Amruta Fadnavis extortion case | अमृता फडणवीस धमकी प्रकरणात ७३३ पानांचे आरोपपत्र दाखल | पुढारी

Amruta Fadnavis extortion case | अमृता फडणवीस धमकी प्रकरणात ७३३ पानांचे आरोपपत्र दाखल

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची फॅशन डिझायनर म्हणून भेट घेत १ कोटी रुपयांसह बुकींची माहिती देण्याची ऑफर देत फसवणुक केली होती. दरम्यान व्हिडीओ क्लिप्स, ऑडिओ आणि अन्य मेसेज पाठवून १० कोटींच्या खंडणीसाठी धमकावले होते. या प्रकरणात मलबार हिल पोलिसांनी संशयित आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ७३३ पानांच्या आरोप- पत्रामध्ये महत्त्वपूर्ण अशा १३ साक्षीदारांच्या जबाब नोंदवण्यात आला आहे. (Amruta Fadnavis extortion case)

बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याची फॅशन डिझायनर मुलगी अनिक्षाविरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मलबार हिल पोलिसांनी १६ मार्चला अनिक्षा जयसिंघानी (२५) हिला उल्हासनगरातील घरातून अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अनिल जयसिंघानी (६०) आणि नातेवाईक निर्मल जयसिंघानी (३१) यांना अटक केली. (Amruta Fadnavis extortion case)

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपींविरोधात विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपीविरुद्ध अधिक पुरावा उपलब्ध झाल्यास, कलम १७३ (८) अन्वये पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button