अमृता फडणवीस धमकी प्रकरण : अनिक्षासह जयसिंघानीच्या कोठडीत २७ मार्चपर्यंत वाढ | पुढारी

अमृता फडणवीस धमकी प्रकरण : अनिक्षासह जयसिंघानीच्या कोठडीत २७ मार्चपर्यंत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणातील आरोपी फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानी हिला  २४ मार्चपर्यंत तर तिचे वडील, वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी याच्यासह त्याचा भाऊ निर्मल जयसिंघानी या दोघांचा पोलीस कोठडीत २७ मार्चपर्यंत वाढ करण्‍यात आली आहे.

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या पत्‍नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांच्‍या लाचेची ऑफर अनिक्षाने दिले होती. तसेच यानंतर त्‍यांना धमकीही देण्‍यात आली होती. या प्रकरणी अनिल जयसिंघानी आणि त्याची फॅशन डिझायनर मुलगी अनिक्षा या दोघांविरोधात २० फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला होता.  मलबार हिल पोलिसांनी १५ मार्च रोजी अनिक्षाला उल्हासनगरातील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली होती. तिला सत्र न्यायालयाने २१ मार्चपर्यंत कोठडीचे आदेश दिले होते.

२० मार्च रोजी  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी याच्यासह दोघांना गुजरातमधील कलोल येथून गुजरात पोलिसांच्या मदतीने अटक केली होती. त्याच्याकडूनकार ताब्यात घेण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक मोबाईल, डॉंगल, अन्य उपकरणेही ताब्यात घेतली आहेत.

Amruta Fadnavis bribe case  : काय आहेत आरोप?

फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानी हिने अमृता फडणवीस यांची भेट घेत ओळख वाढवली. त्‍यानंतर तिने आपल्‍या वडिलाच्‍या  विरोधात दाखल गुन्‍हे गुन्हे रद्द करण्यासाठी अमृता फडणवीस यांना १ कोटींची ऑफर दिली होती. या प्रकरणी त्‍यांनी तक्रार दाखल केली. यानंतर मुंबई पोलिसांनी अनिक्षाला अटक केली.

हेही वाचा 

Back to top button