anil deshmukh
anil deshmukh

Anil Deshmukh On Param Bir Singh: मला फसवण्यासाठी परमबीर सिंग यांचा वापर; अनिल देशमुखांचा आरोप

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग (Anil Deshmukh On Param Bir Singh) यांचा वापर सरकारने मला फसवण्यासाठी केला. आणि आता बक्षीस म्हणून त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे, असा आरोप माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी आज (दि. १७) पत्रकारांशी बोलताना केला. आज पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थितीत करणार असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh On Param Bir Singh) यांनी १०० कोटींचे वसुलीचे टार्गेट दिल्याचा खळबळ जनक गौप्यस्फोट परमबिर सिंह (Param Bir Singh) यांनी केला होता. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. तर या आरोपामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना अटकही झाली होती. तर या आरोपानंतर परमबीर सिंग अनेक महिने भूमिगत होऊन फरार झाले होते. दरम्यान, त्यांच्याविरोधात खंडणी तसेच धमकी अशा बऱ्याच प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, परमबीरसिंह (Param Bir Singh) यांचे निलंबन मागे घेण्याबाबत राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने १२ मेरोजी आदेश काढले होते. कॅटने एक निकाल दिला आहे. ज्या अंतर्गत परमबीर सिंह यांची विभागीय चौकशी चुकीची असल्याचे घोषित करून ती बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच निलंबनाचा आदेश परत घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news