मुंबई : परमबीर सिंग खंडणी प्रकरणात अकबर पठाण यांना पुन्हा नियुक्ती

मुंबई : परमबीर सिंग खंडणी प्रकरणात अकबर पठाण यांना पुन्हा नियुक्ती
Published on
Updated on

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित खंडणीप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांना पुन्हा मुंबईत नियुक्ती देण्यात आली आहे.  शिंदे, फडणवीस सरकारने केलेल्या या नियुक्तीवरून मुंबईसह राज्य पोलिस दलात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

भाईंदरमधील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून जुलै 2021 मध्ये मरीन ड्राईव्ह पोलिसांनी परमबीर सिंग यांच्यासह पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलिस अधिकारी श्रीकांत शिंदे, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, आशा कोरके, खासगी व्यक्ती सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news