कल्याण शिळं रोड वर पोलिसांच्या गाडीने घेतला पेट | पुढारी

कल्याण शिळं रोड वर पोलिसांच्या गाडीने घेतला पेट

नेवाळी; पुढारी वृत्तसेवा

कल्याण शिळं रोड वरील कटाई टोल नाका परिसरात पोलिसांच्या गाडीने अचानक पेट घेतला आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.मात्र काही क्षणातच गाडीचा कोळसा झाला आहे.

कल्याण शिळं रोड वरून पोलिसांची गाडी जात असताना अचानक पेट घेतला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या गाडीमध्ये फटाके असल्याची माहिती मिळाली आहे. या गाडीमध्ये वाहनचालक आणि एक कर्मचारी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.आग लागल्याचं कळताच या दोन्ही जवान वाहनामधून बाहेर आल्याने जीवित हानी टळली आहे.

मात्र या गाडीमधून फटाके कुठे घेऊन जात होते याची माहिती अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलिसांची ही गाडी कल्याण शहराकडे येत होती. पोलिसांच्या गाडीने पेट घेतला या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेही वाचलत का?

 

Back to top button