वाशिममध्ये ३ कोटी ६५ लाख रुपयांचा गांजा जप्त | पुढारी

वाशिममध्ये ३ कोटी ६५ लाख रुपयांचा गांजा जप्त

वाशिम : पुढारी वृत्तसेवा

रिसोड पोलिसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन हिंगोली हद्दीत आज ( दि. १८ ) तब्बल ३ कोटी ६५ लाख रुपये किंमतीचा गांजा पकडला. आयशर ट्रक मधून वाशिम हद्दीतून गांज्याची वाहतूक होत आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक सारंग नवलकार जिल्हा पोलीस अधिक्षक वाशीम यांचे निदर्शनास आणून दिली.

मिळालेल्या माहितीवरुन पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली एक पथक हिंगोली ते रिसोड रोड येथे नेमून सापळा रचण्यात आला. त्यांनतर गांजा नेणारे वाहन आयशर ट्रक ( क्रमांक एम एच २८ बिबि .०८६७ ) याची झडती घेतली. त्यामध्ये अवैध्यरित्या गांज्याची वाहतूक करण्यात येत होती हे स्पष्ट झाले. या प्रकरणी गोटीराम गुरदयाल साबळे वय ५२ वर्ष रा . कुऱ्हा ता . मोताळ जि . बुलढाणा, सिध्दार्थ भिकाजी गवांदे रा.निमगाव ता.नांदुरा जि . बुलढाणा, प्रविण सुपडा चव्हाण रा . हनवतखेड ता . मोताळा जि . बुलढाणा, संदिप सुपडा चव्हाण रा . हनवतखेड ता . मोताळा जि . बुलढाणा अशा चार जणांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा : राज्यातील उपहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढवणार

तसेच सदर कारवाईत ११ क्विंटल ५० किलो गांजा ज्याची किंमत ३ कोटी ४५ लाख रुपये, आयशर ट्रक वाहन किंमत २० लाख रुपये असा एकुण ३ कोटी ६५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईत जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, रिसोड ठाणे पोलीस निरीक्षक श्री सारंग नवलकार , पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार, शिल्पा सुरगडे, पोहवा अनिल कातडे, पोना दिपक रंजवे, भागवत कष्टे, सुनिल इंगळे, गुरुदेव वानखेडे यांचा सहभाग होता.

हेही वाचा : 15 ते 20 भाजप नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात !

Back to top button