Shinde Sarkar news | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत, अजित पवारांचे सूचक वक्तव्य | पुढारी

Shinde Sarkar news | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत, अजित पवारांचे सूचक वक्तव्य

पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्राची सत्ता (maharashtra political crisis) एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्याकडेच राहणार, हे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालाने स्पष्ट झाले. या निकालानंतर (Supreme Court decision on Shiv Sena) एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकेच्या आधारावर त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP leader Ajit Pawar) यांची प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा मागण्याची गरज नाही. ते स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचाराची उंची आणि सध्याच्या लोकांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

”तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता आमच्या विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिला होता, असे व्हायला नको होते. विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लगेच घेऊन हा विषय मार्गी लागला असता तर आमचा अध्यक्ष असता. आमचे अध्यक्ष असते तर ते १६ आमदार अपात्र ठरले असते”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

निकालाच्या आधल्या दिवशीच मी म्हटले होते की १६ आमदारांचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे जाईल असे सांगितले होते. पक्षांतरबंदी कायद्याला अर्थ राहणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून जो काही धडा मिळायचा आहे तो मिळाला आहे. ठाकरेंना त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले, असे त्यांनी नमूद केले आहे.

सत्ता संघर्षाचा बहुप्रतिक्षीत निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला असून निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार बचावल्याचे स्पष्ट झाले आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष देतील, असे घटनापीठाने स्पष्ट केल्याने याबाबतीत शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे. अपात्रतेचे प्रकरण निकाली काढण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढील काळात कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष राहील. सत्ता संघर्षाचा वाद उद्भभवल्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे निर्णय घेतले त्यातले बहुतांश निर्णय चुकीचे होते, अशी टिप्पणी घटनापीठाने केली.

हे ही वाचा :

Back to top button