राज्यातील सरकार बिल्डर आणि कंत्राटदारांचे : आदित्य ठाकरेंचा आरोप | पुढारी

राज्यातील सरकार बिल्डर आणि कंत्राटदारांचे : आदित्य ठाकरेंचा आरोप

पुढारी ऑनलाईन : मुंबईत सहा हजार कोटी रूपयांचा रस्ते घोटाळा आहे. अद्याप मुंबईतील अजून १० रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. येथील रस्त्यांची कामे पावसामुळे रखडली जाऊ शकतात. मुंबईतील रस्त्यांच्या कामांची वारंवार तक्रार करून देखील याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे राज्यात बिल्डर आणि कंत्राटदारांचे सरकार आहे, असा आराेप  उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला. मुंबईतील रस्ते कामातील घोटळासंदरर्भात आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

या वेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  म्हणाले, “मुंबई पालिकेतील अनेक भ्रष्टाचार प्रकरणे समोर आले आहेत. मुंबईतील रस्त्यांच्या कामांची किंमत ६६ टक्क्यांनी वाढवली गेली आहे. अद्याप मुंबईतील अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. यापुढे देखील पावसामुळे कामे पूर्ण होणार नाहित. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.”

सत्तासंघर्षाच्या निकालावर बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मी काही बोलणार नाही. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. या देशाचे संविधान अबाधित राहिले पाहिजे, असे आमचे मत आहे. आम्ही भारताच्या संविधानाचे पूजक आहोत.”

हेही वाचा :

Back to top button